Pimpri : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याची मागणी 

एमपीसी  न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे ऑगस्ट महिन्याचे मानधन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे व शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.  

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर, सांगली, कराड व कोयना धरणक्षेत्रामध्ये  मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोल्हापूर, सांगली, वाळवा, शिराळा व पलूस तालुक्यामध्ये पुराने थैमान घातले आहे.

येथील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात म्हणून महापालिकेतील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ३६ नगरसेवक व २ स्वीकृत नगरसेवक असे ३८ नगरसेवक आपले ऑगस्ट महिन्याचे मानधन पूरग्रस्तांसाठी देणार आहेत. त्यामुळे  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या ३८ नगरसदस्यांच्या ऑगस्ट महिन्याचा मानधनाचा एकत्रित रकमेचा धनादेश देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.