Pimpri : महापालिकेच्या निविदा मराठी भाषेतून काढण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या निविदा इंग्रजी भाषेतून मधून असतात. या निविदा मराठी भाषेतून काढाव्यात अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या निविदा, त्यांच्या अटी-शर्ती मराठीतूनच काढाव्यात. निविदा प्रक्रीया, ठेकेदारांचे करार, कार्यरंभ आदेश (वर्कऑर्डर) मराठीतूनच दिली पाहिजे. राज्य शासनाच्या नियमांनुसार मराठी भाषेतूनच कामकाज करणे अनिवार्य आहे. निविदा प्रक्रिया मराठीतूनच करावी. मराठीतून निविदा प्रक्रिया करुन गुणात्मक, पारदर्शकता, स्पर्धात्मकता वाढावी. यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा.

महापालिकेची इतर कामे मराठीतून होत आहेत. मात्र कंत्राटदारांना मराठी येत नसल्यामुळे निविदा इंग्रजीमधून केल्या जात आहेत. त्यामुळे मराठी बांधवावर अन्याय होत आहे. यापुढील सर्व निविदा मराठीतूनच काढाव्यात अशी मागणी कदम यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.