Pimpri : रेडझोनमधील बांधकामांना सोयी-सुविधा न देण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- रेडझोनबाधीत भूखंडावरील बांधकामासाठी कोणत्याही सार्वजनिक सोयी सुविधा न पुरविणेबाबत दिलेला आदेश रद्द करावा अशी मागणी नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील संरक्षण विभागाच्या रेडझोनमधील बांधकामांना सोयी-सुविधा देण्यात येऊ नयेत. यापूर्वी अनधिकृतरित्या घेतलेल्या सोयी-सुविधा तत्काळ खंडीत करण्यात यावेत, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. हा आदेश त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. रेडझोन हद्दीतील पूर्वी विकसीत झालेल्या मिळकतींना सर्व मूलभूत सुविधा देता येतील असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. यावेळी तात्या भालेकर व रेडझोन समिती सदस्य नरेंद्र भालेकर उपस्थित होते.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहराच्या भेटीवर आलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे रेडझोन बाधितांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात आली. या संबंधीचे निवेदन नगरसेवक प्रविण भालेकर यांनी डॉ. कोल्हे यांना दिले. यावेळी त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक शाम लांडे व रेडझोन समिती सदस्य नरेंद्र भालेकर उपस्थित होते. याविषयी लवकरच संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याबरोबर बैठक बोलावून हा प्रश्न मांडण्यात येईल असे डॉ कोल्हे यांनी आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.