Pimpri : ‘आरटीओ मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा’

पिंपरी युवासेनेची परिवहनमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी पिंपरी युवासेनेने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे.

याबाबत रावते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयामध्ये अंदाधुंद कारभार सुरू आहे. बॅच बिल्ला मिळण्यासाठी अपुरे कागदपत्रे, बोगस रहिवाशी दाखले, ज्या दिवशी संबंधित अधिकारी रजेवर आहे. त्याच दिवशी त्यांच्या सहीने दाखले वितरित केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फिटनेस प्रमाणपत्राच्या वाहन चाचणीचे व्हिडीओ चित्रीकरण करणे बंधनकारक असताना त्याचे कुठलेही रेकॉर्ड उपलब्ध नाही. या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

युवासेनेच्या प्रतीक्षा घुले, निलेश हाके, अॅड.अजित बोराडे, सनी कड, ओंकार जगदाळे, राहुल राठोड निवेदन देताना उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.