BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: हगणदारी मुक्त शहराचे मानांकन ठरणार; शहरात सर्वेक्षण पूर्ण, राज्य सरकारच्या पथकामार्फत पाहणी

एमपीसी न्यूज – केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात हगणदारी मुक्त शहराचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या पथकाने शहराची पाहणी केली असून हगणदारी मुक्त शहराचे मानांकन ठरणार आहे.

हगणदारी मुक्त शहरासाठी दर सहा महिन्याला सर्वेक्षण करण्यात येते. स्वच्छ भारत अभियानात शहराची पिछाडी झाल्याने मोठ्याप्रमाणावर टीका झाली होती. मानांकन वाढावे, यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत. शहरात सर्वेक्षण सुरू पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण करणा-या पथकाने सार्वजनिक ठिकाणी प्रात:विधीस नागरिक जातात का? सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था काय आहे.

सांडपाणी आणि मैला यावर प्रक्रिया करणारे एसटीपी प्रकल्पांची सद्य:स्थिती काय आहे, याची पाहणी केली. पथकातील अधिका-यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून एका स्वच्छतागृहाचे किमान 65 छायाचित्रे टिपून ती सर्वेक्षणासाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर अपलोड केले होते.

HB_POST_END_FTR-A2

.