Pimpri: बढती की अवमूल्यन; अधिकाऱ्यांमध्ये रंगली चर्चा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोरोनाचा कहर सुरु असतानाच ‘मलईदार’ विभागातील अधिका-यांना बढत्या देत आपले मनसुभे स्पष्ट केले आहेत. त्यातच बांधकाम परवानगीतून महापालिकेला विक्रमी उत्पन्न देऊनही अधिका-यांचे विभाग बदलले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी बढती दिली की अवमूल्यन केले, असा प्रश्न काही अधिका-यांना पडला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा तीन वर्षाचा कार्यकाल पुर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीच्या जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे. त्यातच कोरोनाचे संकट हाताळण्यात त्यांना आलेल्या अपयशामुळेही राज्य सरकार त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. ही परिस्थिती हाताळण्यात आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर फेल गेल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये वाढत असलेला असंतोष कमी करण्यासाठी आयुक्तांनी क्लुप्ती लढवून काही अधिकाऱ्यांना बढत्या दिल्या होत्या.

कोरोनाचा कहर सुरु असतानाही आयुक्त हर्डीकर सत्ताधारी भाजप पदाधिका-यांचे हितसंबध जोपासण्यातच दंग आहेत. अशा परिस्थितीत आयुक्तांनी मंगळवारी मलईदार विभागातील अधिका-यांना बढत्या दिल्या. त्यामध्ये काही अधिका-यांना बढत्या दिल्या ख-या पण त्यांचे विभाग काढले.

त्यामुळे बढती दिली की अवमूल्यन केले, असा प्रश्न अधिका-यांना पडला आहे.  अधिका-यांना विभाग देण्यामध्ये मोठा राजकीय हस्तक्षेप झाला असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.