Pimpri: कोविड सेंटरचे काम जलदगतीने करा, ऑक्सिजन बेडची क्षमता वाढवा – अजित पवार

Pimpri: Deputy Chief Minister Ajit Pawar inspects the work of Covid Center at Nehrunagar वाढत्या रूग्णांच्या सोयीसाठी पिंपरी येथील नेहरूनगर मध्ये नव्याने एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडी आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एकत्रितपणे नेहरूनगर येथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकार 50 टक्के निधी देत आहे. या सेंटरचे काम जलदगतीने पूर्ण करावे. पावसाचे पाणी साचणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. ऑक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यात यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

या कामाची पवार यांनी आज (शुकवारी) पाहणी केली. विभागीय आयुक्त सौरभ राव , जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडीचे गटनेते बाबा बारणे,  मनसेचे गटनेते सचिन चिखले, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, समीर मासुळकर आदी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यानुसार  जिल्ह्यात जम्बो सुविधा सुरु करण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न  करत आहे. वाढत्या रूग्णांच्या सोयीसाठी पिंपरी येथील नेहरूनगर मध्ये नव्याने एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारण्याची तयारी जोरात सुरू आहे. यासाठी येणारा 50 टक्के निधी राज्य सरकार आणि 50 टक्के निधी  पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडी आणि जिल्हाधिकारी कार्यालय देत आहे.

सेंटरचे काम जलदगतीने  पूर्ण करावे. ऑक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यात यावी असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे का, काम चांगले करा. पावसाचे पाणी साचणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. ऑक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी  दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.