_MPC_DIR_MPU_III

Pimpri: झुंजार सहकारी गमावला; नगरसेवक दत्ता साने यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

Deputy Chief Minister Ajit Pawar pays homage to corporator Datta Sane चांगला सहकारी गमावल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक दत्ता साने यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार कार्यकर्ता, चांगला सहकारी गमावल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक दत्ता साने यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे. संघटनेची ध्येयधोरणे तडफेने राबविणाऱ्या या झुंजार कार्यकर्त्याची, सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहातील तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांचं योगदान पक्ष कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.