Pimpri: अजितदादांचे शहराकडे लक्ष; आयुक्तांकडून  घेतात आढावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून रुग्णांनी पन्नाशी ओलांडली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे शहराकडे बारीक लक्ष आहे. पवार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून उपाययोजना, रुग्णांची माहिती घेत आहेत. प्रशासनाला विविध सूचना करत आहेत.

शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना पालकमंत्री अजित पवार कुठे आहेत असे प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार दररोज आढावा घेत असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले आहे.

विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, ”शहरातील कोरोनाबाबतचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार दररोज घेत आहेत. दादा आयुक्तांना विविध सूचना करत आहेत. प्रभावी उपाययोजना राबविण्याचे दादांनी आदेश दिले आहेत. आमच्याकडून देखील ते माहिती घेतात. दादांचे शहराकडे बारकाईने लक्ष आहे”.

शहरातील कोरोना संदर्भातील उपमुख्यमंत्री अजित पवार माहिती घेत आहेत. विविध सूचना देखील करत आहेत असे सांगत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले,  शहरातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी प्रत्येकाने काळजी घेतल्यास कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश येईल. झोपडपट्टीमध्ये वाढणारे रुग्ण हे प्रशासकीय यंत्रणेसमोरील आव्हान आहे. नागरिकांनी होम डिलीव्हरी करणार्‍या यंत्रणेची मदत घेऊन बाहेर न पडता जीवनावश्यक वस्तू घरपोहोच मागवाव्यात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.