Pimpri: काँग्रेसकडून उपमहापौर, राष्ट्रवादीकडून ‘स्थायी’चे सभापतीपद आता भाजपकडून महापौरपदाचा अर्ज

नियोजित महापौर माई ढोरे यांचा राजकीय प्रवास

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून सांगवीचे प्रतिनिधीत्व करणा-या उषा उर्फ माई ढोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपची एकहाती सत्ता असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. काँग्रेसकडून उपमहापौर, राष्ट्रवादीकडून ‘स्थायी’ समितीचे सभापतीपद आता भाजपकडून महापौरपद असा नियोजित महापौर माई ढोरे यांचा राजकीय प्रवास आहे.

पिंपरी महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. पहिले अडीच वर्ष भोसरीकरांकडे महापौरपद होते. च-होलीचे नितीन काळजे हे भाजपचे पहिले महापौर झाले. जाधववाडीचे राहुल जाधव यांना दुस-या सव्वा वर्षात महापौरपदी काम करण्याची संधी मिळाली.

दुस-या अडीच वर्षाचे महापौरपद चिंचवडकरांकडे गेले आहे. सांगवीच्या ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे यांचा महापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. भाजपची एकहाती सल्ला असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. शहराच्या सातव्या महिला महापौर होण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

माई ढोरे यांची नगरसेवकपदाची चौथी टर्म आहे. काँग्रेसकडून 1995-1996 मध्ये माई ढोरे उपमहापौपद भुषविले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2006-2007 मध्ये स्थायी समितीचे सभापतीपद भुषविले आहे. आता भाजपकडून महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.