Pimpri: लॉकडाउनमध्ये उपमहापौर तुषार हिंगे यांच्याकडून गरजूंना अन्नधान्य, सुरक्षा किटचे वाटप

Deputy Mayor Tushar Hinge distributes food grains and safety kits to the needy in lockdown

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा संसर्ग, प्रसार वाढू नये म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. त्या काळात सर्वसामान्य, कष्टकरी, दिव्यांग, निराधार, गरजू लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपमहापौर तुषार हिंगे पहिल्या दिवसांपासून कार्यरत आहेत.

शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी प्रभाग क्रमांक दहामधील गरजू नागरिकांना धान्य, भाजीपाला, भोजन तसेच औषध वितरणासह औषध फवारणी, सॅनिटायझर टनेल उभारणी, तात्पुरता भाजीपाला विक्री केंद्र, मास्क व सॅनिटायझर वितरीत करण्यात  पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या सक्रिय पुढाकाराबद्दल  प्रभागातील नागरिक कौतुक करीत आहेत.

चिंचवड स्टेशन येथील पोलिस लाइन वसाहत येथील 100 कुटुंबांना 15 दिवसांचा भाजीपाला त्यांनी वितरीत केला. निगडी व पिंपरी पोलीस ठाण्यात सॅनिटायझर टनेल बसविण्यात आल्याने पोलिस अधिकारी व कर्मचारी स्वत:ला निर्जंतूक करून कामकाज करीत आहेत.

उपमहापौर हिंगे व कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक 10 मध्ये स्व:खर्चाने औषध फवारणी केली.   त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडूनही औषध फवारणी करून घेतली.

प्रभागातील 100 गरजू कुटुंबाना किराणा व अत्यावश्यक साहित्याचे किट देण्यात आले. ‘विटॉमीन सी’ या कॅल्शियम वाढीच्या होमिओपॅथी औषधाचे प्रभागातील तब्बल 7 हजार 500 कुटुंबांना मोफत वितरण करण्यात आले.

प्रभागातील गरजू, कष्टकरी, दिव्यांग, ज्येष्ठ आणि निराधार असा एकूण 2 हजार लोकांना दररोज भोजन वितरण सुरू आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हा उपक्रम सुरू आहे.

प्रभागातील 9 झोपडपट्यांतील अनेक रहिवाशांना रेशनकार्डवर धान्य मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत होती. त्याबाबत तहसीलदार व अन्नधान्य वितरण विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन सर्वसामान्यांना रेशन दुकानातून योग्य प्रमाणात धान्य मिळवून दिले.

तसेच, शाहूनगर व मोरवाडीत तात्पुरती भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्या ठिकाणी सॅनिटायझर टनेल उपलब्ध करून दिले.

कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी दत्तनर, विद्यानगर, शंकरनगर, लाल टोपीनगर या झोपडपट्टयात मंडप घालून मुख्य रस्ते सील करण्यात आले.

उपमहापौर हिंगे यांनी स्वत:चे थरमॅक्स चौक, चिंचवड येथील पंजाब रसोई हॉटेल पोलिसांना विश्रांतीसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. त्याचा लाभ असंख्य पोलिस अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.

उपमहापौर हिंगे आणि त्यांच्या आरंभ सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य व शेकडो कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.