Pimpri: उपमहापौर तुषार हिंगे यांनी पोलिसांसाठी उपलब्ध करून दिले विनामूल्य हॉटेल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. स्वत:चा व आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून ते सेवा देत आहेत. पोलिसांनी घरी न जाता हॉटेलमध्ये विश्रांती केल्यास त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. त्यामुळे उपमहापौर तुषार हिंगे यांनी माणूसकी व सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून आपले हॉटेल पोलिसांना विनामोबदला उपलब्ध करून दिले आहे.

हिंगे यांचे चिंचवड थरमॅक्स चौकात ग्लोरी पंजाब रसोई हे हॉटेल आहे. ते त्यांनी पोलिसांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. त्या संदर्भातील पत्र त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना नुकतेच दिले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच रस्त्यावरील गर्दी कमी करणे, बाधित रूग्णांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या लोकांना शोधणे, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच लॉकडाऊन आणि संचारबंदीची अंमलबजाणी पोलिस यंत्रणा करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.