Pimpri: स्मशानभूमींचा पर्यावरणपूरक पद्धतीने विकास करा – महापौर जाधव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील स्मशानभूमींचा पर्यावरणपूरक पद्धतीने विकास करावा, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.

महापालिकेच्या तळवडे, चिखली, मोशी, च-होली व डुडुळगाव येथील विविध चालू असलेल्या विकासकामांची पाहणी महापौर यांनी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. महिला बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे, नगरसेविका साधना मळेकर, अश्विनी जाधव, नगरसेवक लक्ष्मण सस्ते, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, आण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता महेश बरिदे, जे. डी. जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी तळवडे येथील स्मशानभूमीमध्ये सीमाभिंत बांधणे, वृक्षारोपण, पाण्याची टाकी, विजेची व्यवस्था, स्मशानभूमीसाठी शेड, पोहोच रस्ता, रंगरंगोटी, स्वच्छतागृहाची व्यवस्था, लॅंडस्केपिंग, सुसज्ज पार्कींग आदी सुविधा तातडीने देण्याबाबत महापौर जाधव यांनी अधिका-यांना सूचना केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.