Pimpri: कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तफावत; वॉररुममधील ‘डॅश बोर्ड’वर वेगळीच आकडेवारी 

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात येणा-या कोरोना रुग्ण संख्येच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. महापालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज दिवसभरात 13 पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याची आणि आजपर्यंतची रुग्ण संख्या 265 झाल्याची माहिती दिली. तर, त्याचवेळी महापालिकेच्या वॉर रुममधील ‘डॅशबोर्ड’वर आज दिवसभरात 21 नवीन रुग्णांची नोंद झाल्याची माहिती असून आजपर्यंत 274 जणांना लागण झाली असल्याची माहिती आहे.  त्यामुळे महापालिकेकडून कोरोना रुग्णांची आकडेवारीची लपविली जाते की काय, अशी शंका निर्माण होत आहे.

महापालिकेकडून दररोज शहरातील कोरोना रुग्णांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली जाते. तर, स्मार्ट सिटी अंतर्गत कोरोना वॉर कार्यरत आहे. त्याच्या डॅशबोर्डवर देखील माहिती अपडेट केली जाते.

महापालिकेने आज साडेसात वाजता दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार आनंदनगर झोपडपट्टीसह चिखली, भोसरी, रहाटणी, काळेवाडी, दापोडीतील 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले. तर, येरवड्यातील पण वायसीएमएचमध्ये दाखल असलेल्या एकाचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती दिली आहे.

तर, सकाळीच कुदळवाडी आणि बिजलीनगर येथील दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे या प्रसिद्धीपत्रकानुसार पुण्यातील रुग्णासह दिवसभरात 14 नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजपर्यंत 265 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्याचवेळी महापालिकेच्या डॅशबोर्डवर वेगळीच माहिती उपलब्ध आहे. डॅशबोर्डवर दिवसभरात 21 नवीन रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे. तर, आजपर्यंत 274 जणांना कोरोनाची लागण झाली  असून 161 जण कोरोनामुक्त झाल्याची नोंद आहे.

या दोनही माहितीत आकड्यांची मोठी तफावत आहे. त्यामुळे महापालिकेकडून रुग्णांची माहिती दडविली जाते का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like