Pimpri : जागतिक जल दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी डिजिटल वक्तृत्व स्पर्धा

एमपीसी न्यूज – जागतिक जल दिनानिमित्त टाटा मोटर्स, इसिए आणि पर्यावरण दूत यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवडमधील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘पाणी बचत आणि माझा सहभाग’ हा या स्पर्धेचा विषय आहे.

12 ते 16 वयोगटातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी व इतर भाषांमधील विद्यार्थी सुद्धा या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. सहभागी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावरील आपला पाच मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हाट्सअॅप वर पाठवायचा आहे.

सातवी, आठवी, नववी असे विद्यार्थ्यांचे तीन गट केले जाणार आहेत. या प्रत्येट गटातून तीन विजेते निवडले जातील. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी 9405042938 या नंबर 5 एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करायची आहे. 14 एप्रिलला स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

स्पर्धेसाठी चार विषय देण्यात आले आहेत.यामध्ये शुद्ध पाणी आणि आरोग्यदायक स्वच्छता, पावसाच्या पाण्याची साठवण, पाण्याचा पुनर्वापर आणि पाणी सगळ्यांसाठी या विषयांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.