Pimpri : पीएमपीएमएलकडून पिंपरी-चिंचवडवासियांची घोर निराशा -नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर परीवहन महामंडळ लिमिटेड यांच्या वतीने पिंपरी चिंचवड व आसपासच्या परिसरातील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती शहरातील नागरीकांना आणि पर्यटकांना व्हावी, या उद्देशाने पिंपरि चिंचवड दर्शन बससेवा आज सुरु करण्यात आली आहे. परंतु या बससेवेत तिकीट दर जास्त असल्यामुळे हि बस सेवा व्यवहार्य ठरणार नाही, असे परखड मत विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी प्रसिध्दी पत्रकांद्वारे व्यक्त केले.

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकांत म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड दर्शन बससेवेचे तिकीट माणसी पाचशे (500) रुपये ठेवले आहे. परंतु या बससेवेसाठी असणा-या बसेस जीर्ण झालेल्या असून पूर्वी त्या हिंजवडी ते पुणे विमानतळ या सेवेसाठी कार्यरत होत्या. ती सेवा बंद पडल्यामुळे या बसेस पिंपरी चिंचवडसाठी पाठविण्यात आल्या आहेत. पुन्हा एकादा पीएमपीएमएलने पिंपरी चिंचवड शहरासाठी दुजाभाव दाखवून दिला आहे.

  • पीएमपीएमएल दैंनदिन पास हा ज्येष्ठासाठी 40 रुपये तर सर्वसामांन्यासाठी 70 रुपये आहे. त्यामुळे 500 रुपये खर्च करुन किती नागरीक या सेवेचा लाभ घेतील का? याबाबत साशंकताच आहे. यापेक्षा खासगी कॅब सेवा स्वस्तात घेता येते. त्यामुळे या बससेवेचे दर किफायतशीर ठेवणे गरजेचे आहे.

तसेच पिंपरी चिंचवड शहरात सध्या कच-याची समस्या भयंकर झाली असून शहरात जागोजागी कच-याच्या ढिगांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. 500 रुपये घेऊन पीएमपीएमएल हे कच-यांचे ढिग दाखविणार आहेत काय? मोठा गाजावाजा करुन पिंपरी चिंचवड दर्शन बससेवा करुन शहरवासियांच्या तोडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.