Pimpri: पालिकेकडून स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

Disaster management training for volunteers from the municipality ड्रोन कसा वापरतात याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे

एमपीसी न्यूज – पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून स्वयंसेवकांना  आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. बोट चालविणे, पाण्यात बुडणा-याला बाहेर कसे काढायचे. सेफ्टी मेजर कसे वापरायचे. ड्रोन कसा वापरतात याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे प्रमुख किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून मुळा नदी 11 किमी, पवना नदी 25 किमी आणि इंद्रायणीनदी 20.60 किमी वाहते. पवना आणि मुळा नदीला पावसाळ्यात पूर येतो. पूराचे पाणी नदीकाठच्या घरात घुसते. त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. त्यापार्श्वभूमीवर पालिकेने यंदा खबरदारी घेतली आहे. त्यादृष्टीने उपाययोजना सुरु केल्या आहेत.

पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी महापालिका स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार आहे. पूरपरिस्थितीत जिथे पाणी शिरते अशी 13 ठिकाणे निश्चित केली आहेत. जुनी सांगवी ते रावेतपर्यंतची ही ठिकाणे आहेत. प्रत्येक ठिकाणी 20 ते 25 जणांचा ग्रुप तैनात केला जाणार आहे.  या स्वयंसेवकांना पालिकेकडून पूरपरिस्थिती हातळण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.  काही स्वयंसेवकांना वाल्हेकरवाडी जाधव घाट येथे शुक्रवारी प्रशिक्षण देण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापनात बोट चालविणे, अग्निशामकचे प्रशिक्षण दिले जात आहे.  बोटिंग कसे चालवितात. पाण्यात बुडणा-या व्यक्तीला  बाहेर कसे काढायचे. सेफ्टी मेजर कसे वापरायचे. ड्रोन कसा वापरतात. प्रथम उपचार कसे द्यायचे याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.