Pimpri: बदलीची शक्यता असलेले आयुक्त अन् ठेकेदाराच्या अँटीचेंबर बैठकीची चर्चा; शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची हरकत

एमपीसी न्यूज – बदली होणार… बदली होणार… अशी शक्यता वर्तविली जात असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) निवडक पदाधिकारी आणि ठेकेदारांसमवेत अँटीचेंबरमध्ये बैठक घेतली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी या बैठकीला हरकत घेतली आहे. नगरसेवक, पत्रकार, नागरिकांना सहजासहजी उपलब्ध नसलेले आयुक्त ठेकेदारांना नियमीतपणे कसे भेटतात, हे उघड गुपित असल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

शनिवार, रविवार सलग दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज (सोमवारी) महापालिकेत नागरिकांची वर्दळ होती. अनेक नागरिक आपली कामे घेऊन आयुक्तांना भेटण्यासाठी महापालिकेत आले होते. परंतु, आयुक्त श्रावण हर्डीकर साडेतीन वाजताच्या सुमारास महापालिकेत दाखल झाले. आयुक्तांना भेटण्यासाठी नागरिक वेटिंगवर थांबले होते. अनेक नगरसेवक, पत्रकार देखील ताटकळत थांबले होते. परंतु, अँटीचेंबरमध्ये ठेकेदारांसमवेत बैठक घेण्यात दंग होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर पाचच्या सुमारास ठेकेदाराच्या गराड्यातच बाहेर पडले. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी त्याचे छायाचित्र देखील काढले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती, शिक्षण समितीचे पदाधिकारी आणि ठेकेदारांची बैठक चालू होती. नगरसेवक, पत्रकार, नागरिकांना सहजासहजी उपलब्ध नसलेले आयुक्त ठेकेदारांना नियमीतपणे कसे भेटतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत प्रतिक्रियेसाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. संपर्क झाल्यास त्यांचे मत अपटेड केले जाईल.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like