Pimpri: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, पिंपरी विधानसभा संघटकपदी दिशान मुखर्जी

Pimpri: Dishan Mukherjee as Nationalist Students Congress, Pimpri Assembly Organizer राष्ट्रवादी संघटना विस्तारासाठी जीव लावून काम करा, असा विश्वास व्यक्त करत शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिशान मुखर्जी यांना निवडीचे पत्र दिले

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी विधानसभा संघटकपदी दिशान सुशांत मुखर्जी यांची निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी प्रवक्ते फजल शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष संतोष वाघेरे, अध्यक्ष प्रतिक इंगळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष शक्रुलाभाई पठाण, प्रसाद पाटील, आदित्य डमाले, सत्यम फलके व पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना विस्तारासाठी जीव लावून काम करा, असा विश्वास व्यक्त करत शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिशान मुखर्जी यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.