Pimpri : लघुउद्योजकांचा शास्तीकर पूर्णपणे रद्द करा; पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेची श्रीकांत भारतीय यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – शास्तीकर आणि लघुउद्योजकांना भेडसावणा-या विविध समस्यां मार्गी लावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांना लावण्यात आलेला शास्तीकर पूर्णपणे रद्द करावा, औद्योगिक परिसरातील मूलभूत सुविधांचे पुनर्निर्माणबाबत, रस्ते, भुयारी गटारे आदी औद्योगिक परिसरामध्ये प्रयत्न करावे. कंपन्यामधील होणाऱ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या कमी करण्याकडे लक्ष देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या टी २०१ पुर्वसन प्रकल्पाबाबत, पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना माथाडी कामगार संघटनाकडून होणाऱ्या त्रास होत आहे.

  • याबाबत पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिक कामगार न्यायालयाच्या स्थापनेबाबत.आय.टी. कंपन्यांना मिळकतकर निवासी दराने लावण्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्याच दराने उद्योगांनाही पालिकेने मिळकत कर आकारावा. मोहननगर चिंचवड येथील ई.एस.आय.हॉस्पिटलमध्ये पुरेशे प्रशिक्षित डॉक्टर आणि कामगार नाहीत. तसेच वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आहेत. प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक ७ व १० येथे सुविधा केंद्राचे डिझाईन पास झाले असून त्याचे काम अद्याप चालू झाले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.