Pimpri : गाडीचे चाक पायावरून गेल्यावरुन वाद; पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज – गाडीचे चाक पायावरुन गेल्याने इसमाचे एका तरुणासोबत भांडण झाले. यावरून इसमाच्या पत्नीने तरुणाच्या आईला मारहाण केली. ही घटना 7 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

अनुराधा सुरेंद्र पाटील (वय 36), सुरेंद्र पाटील (वय 40, दोघे रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र आणि फिर्यादी महिलेच्या मुलाचे गाडीचे चाक पायावरून गेल्याच्या कारणावरून भांडण झाले. यावरून सुरेंद्र यांच्या पत्नीने मुलाच्या घरी जाऊन तरुणाच्या आईचे केस धरून मारहाण केली. यामध्ये मुलाची आई जखमी झाली. तसेच सुरेंद्र याने फिर्यादी महिला आणि तिच्या मुलाला शिवीगाळ करून संपवून टाकण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.