Pimpri: कर्मचार्‍यांना पावसाळी साहित्यांचे वाटप करा- संदीप वाघेरे

Pimpri: Distribute rain materials to employees- Sandeep Waghere कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर हे सर्व कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता शहरातील नागरिकांची सेवा करीत आहेत. त्यासाठी त्यांना वेळीच साहित्य सामग्री उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचार्‍यांना पावसाळी साहित्यांचे त्वरित वाटप करावे, अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

महापालिकेचे सफाई कामगार, मजूर, वॉलमन, रखवालदार, मुकादम, माळी, शिपाई यांना पावसामध्ये भिजत काम करावे लागते. मागील वर्षी पवना नदीला आलेल्या पुरामध्ये प्रभागातील संजय गांधीनगर झोपडपट्टीमध्ये कोणत्याही साहित्य सामग्री शिवाय काम करताना दिसत होते.

कामगारांना वेळेवर साहित्य पुरवठा करणे महापालिकेची महत्वाची जबाबदारी आहे.

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर हे सर्व कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता शहरातील नागरिकांची सेवा करीत आहेत. त्यासाठी त्यांना वेळीच साहित्य सामग्री उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

महापालिकेच्या वतीने कर्मचार्‍यांना रेनकोट, गमबुट इत्यादी आवश्यक पावसाळी साहित्यांचे त्वरित उपलब्ध करून द्यावे अशी मागणी वाघेरे यांनी निवेदनातून केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.