Pimpri : सांगली पूरग्रस्त भागातील 5 शाळांतील मुलांना शालेय साहित्य वाटप

एमपीसी न्यूज – सांगली येथे आलेल्या महापुरामुळे शालेय साहित्याचे अतोनात नुकसान झाले होते. पूरग्रस्त मुलांची वही-पुस्तक कंपास सगळंच भिझले होती. हा व्हिडीओ प्रसार माध्यमातून पाहिल्यावर त्या मुलांसाठी मदत करण्याचे पिंपरी-चिंचवड मैत्री ग्रुपने ठरवले आणि मित्रांना आवाहन करून शालेय साहित्यसाठी मदत निधी जमा केला. अवघ्या 5 दिवसात 915 शालेय किट साठी मदत उभी राहिली. यामध्ये पिंपरी चिंचवड शहर तसेच परदेशातील मित्रांनीही हातभार लावला.

रेश्मा बोरा ह्यानी आपल्या भावांना पूरग्रस्तांना मदतीसाठी पत्र लिहून रक्षाबंधनची ओवाळणी मदत म्हणून करण्याचा आवाहन केले होते. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

पहिल्या टप्प्यात 615 किट सांगली येथे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर आणि अप्पर आयुक्त निलीमा धायगुडे यांच्या मार्गदर्शनाली व सांगली जिल्हा शिक्षण मंडळाचे अधिकारी विठ्ठल गोरडे यांच्या सहकार्याने सांगली जिल्ह्यातील 1) जीवनविकास शिक्षणमंदिर सांगलीवाडी,2) सौ लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील विद्यालय सांगली,3) शे.र.वि.गो. सर्वोदय विद्यालय. सांगली,4) म.न.पा. उर्दू शाळा, सांगली,5) सौ.कमलादेवी गोविंद हारुगडे शिक्षण मंदिर, सांगलीवाडी, या शाळातील मुलांना प्रत्यक्ष शालेय साहित्य देण्यात आली.

ह्यातील काही शाळातील मुले ही गरजू आणि वंचित, भटकी, मदारी, बंजारा, वाल्मिकी भीक मागून पोट भरणाऱ्या कुटूंबातील होती. हातातील किट पहिल्या नंतर चा आनंद हा खूप अविस्मरणीय होता

ह्या किटमध्ये मुलांना 10 वही, कंपास, चित्रकला साहित्य, कार्यानुभव साहित्य असे साहित्य दिले गेले. जवळपास 550 डझन वह्या सह एक लाख 30 हजार रुपयांचे साहित्य ह्या सर्व मुलांना पहिल्या टप्त्यात दिले गेले.पुढील साहित्य इतर शाळांना दुसऱ्या टप्यात देण्यात येणार आहे.

ह्या किटसाठी मदतनिधी उभारण्याचे कार्य रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडीचे डायरेक्टर रोटरीयन गणेश बोरा, स्वप्नील सोलनकर, गणेश जाधव, वैभव गाजरे, गणेश शिंदे ह्यानी पिंपरी चिंचवड मैत्री ग्रुपच्या माध्यमातून केले.

ही भेट देताना ह्या सर्व मुलांना प्रत्येक शाळेत नदी प्रदूषण, पाणी बचत प्लॅस्टिक वापर ह्यावर त्याची पर्यावरण रक्षणासाठी असणारी जबाबदारी याबाबतीत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडीचे डायरेक्टर गणेश बोरा ह्यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.