Pimpri: विहिंप, बजरंग दल, इस्कॉनतर्फे शहरात आयुर्वेदिक काढ्याचे वितरण

एमपीसी न्यूज – कोरोना या वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी अजूनही कोणते उपचार व लस उपलब्ध झालेली नाही.  या महामारीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनच्या वतीने आजपासून दररोज पाच हजार नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी  शहरात मोफत आयुर्वेदिक काढा वितरण सुरु करण्यात आले आहे.

वैभवनगर, पिंपरीगाव येथे सुरु करण्यात आलेले उपक्रमाचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार आणि सहाय्यक आयुक्त संदीप खोत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक विलास लांडगे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर अहिरराव, विहिंपचे चिंचवड विभाग मंत्री नितीन वाटकर, संयुक्त जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक  संभाजी बालघरे, दत्ता यादव, कुणाल सातव, मंगेश नढे , मुंकुद चव्हाण, निखिल भालके, अविनाश कदम, युवराज पाटील तसेच विहिंप बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेला हा आयुर्वेदिक काढा  वायसीएम रुग्णालयामधील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, साफसफाई कामगार, पोलीस स्टेशन व शहरातील कोरोनाशी लढा देणाऱ्या योद्यांना व नागरिकांना वितरण करण्याची सोय विहिंप, बजरंग दल, इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनवतीने करण्यात आले आहे.

कोरोना या वैश्विक महामारीला रोखण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. घराबाहेर न पडणे, सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे. त्याच बरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी गोळ्या घेणे, या उपाय योजना सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.