Pimpri: जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा

Pimpri: District Collector Naval kishore Ram took review of the situation in Corona आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या उपाययोजनांची माहिती त्यांना दिली.

एमपीसी न्यूज – पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. पालिकेच्या वॉर रुमला भेट देऊन माहिती घेतली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. दररोज रुग्ण वाढीचा उच्चांक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पालिकेच्या कोविड 19 वॉर रुमला भेट दिली. शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी राबविण्यात येणा-या उपाययोजनांची माहिती घेतली. रुग्णवाढ रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी पालिकेला केल्या आहेत.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या उपाययोजनांची माहिती त्यांना दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाचे कार्याधिकारी सौरभ राव, शिक्षण आयुक्त मनोज सोळंके, पालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, उपायुक्त सुभाष इंगळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.