BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : महापालिकेच्या कायदा सल्लागारपदी अॅड. अजय सूर्यवंशी यांची नियुक्ती करु नका

सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांची मागणी

170
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कायदा सल्लागारपदी अॅड. अजय सूर्यवंशी यांची पुन्हा नियुक्ती पुन्हा करण्यात येऊ नये. स्थायी समितीने सदस्य पारित केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करु नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे, महापालिकेच्या कायदा सल्लागारपदी पुन्हा अॅड. अजय सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्याबाबचा ठराव 8 मार्च रोजी झालेल्या सभेत केला आहे. हा ठराव सदस्यपारित आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी महापालिकेत एकदा मानधन तत्वार नियुक्ती केल्यानंतर आणि त्या व्यक्तीची मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ देऊ नये असा निर्णय घेतला होता.

अॅड. अजय सूर्यवंशी हे यापूर्वी महापालिकेत कायदा सल्लागार होते. त्यांनी तब्बल 9 वर्ष या पदावर काम केले होते. त्यांची महापालिकेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा सूर्यवंशी यांना सल्लागारपदी घेऊ नये. त्याचबरोबर मानधनतत्वावर नियुक्ती करताना जाहिरात देणे बंधनकारक आहे. स्थायी समितीला कायदा सल्लागार थेट पद्धतीने नियुक्त करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे शासकीय नियमाप्रमाणे नवीन कायदा सल्लागार नेमावा. कोणच्याही दबावाला बळी पडून पुन्हा कायदा सल्लागारपदी अॅड. अजय सूर्यवंशी यांची नेमणूक करण्यात येऊ नये. सदस्यपारित केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करु नये, अशी मागणी वाघेरे यांनी निवेदनातून केली आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3