Pimpri: डॉक्टर पतीने पत्नीच्या खोट्या सह्या करून फ्लॅटवर काढले 40 लाखांचे कर्ज

एमपीसी न्यूज – पती-पत्नीने फ्लॅट विकत घेऊन त्यावर 32 लाखांचे कर्ज काढले. त्यानंतर पतीने पत्नीच्या खोट्या सह्या करून बजाज फायनान्सचे तब्बल 40 लाखांचे कर्ज काढून फसवणूक केली. हा प्रकार पिंपरी, संत तुकारामनगर येथे नुकताच उघडकीस आला.

याप्रकरणी डॉ. अमोल होळकुंदे (रा. फ्लॅट नं. 2, मित्तल को. ऑप हौसिंग सोसायटी, अजमेरा, पिंपरी), प्रशांत परब, प्रकाश कन्हैया यांच्यासह आणखी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमोल याची पत्नी योगिता अमोल होळकुंदे (वय 33) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगिता व आरोपी डॉ. अमोल होळकुंदे पती-पत्नी आहेत. या दोघांनी अजमेरा येथील अंतरिक्ष सोसायटीजवळ 35 लाख 50 हजारांना फ्लॅट घेतला. हा फ्लॅट घेण्यासाठी त्यांनी एचडीएफसी बॅकेचे 25 लाख 50 हजार कर्ज काढले. इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सचे लोन टॉपअप करून 7 लाखांचे कर्ज काढले.

2016 मध्ये आरोपी डॉ. अमोल होळकुंदे हा पत्नी व मुलीला सोडून गेला. त्यानंतर आरोपी अमोलने साथीदारांच्या मदतीने 3 मे 2017 रोजी त्याच फ्लॅटवर पत्नीच्या बनावट सह्या करुन वाकडेवाडी येथील बजाज फायनान्सचे तब्बल 40 लाख 50 हजार रूपयांचे कर्ज काढून फसवणूक केली. हा गुन्हा पिंपरीतून खडकी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आहे. खडकी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.