Pimpri : अॅड. जया उभे यांना डॉक्टरेट

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील अॅड. जया उभे यांना दिल्ली येथील विश्वकर्मा युनिव्हर्सिटीच्यावतीने डॉक्टरेट पदवीने गौरविण्यात आले आहे. अॅड. जया उभे यांनी वकिलीसोबतच राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, मराठी, अर्थशास्त्र आदी विषयांमध्ये पदवी संपादन केली आहे. त्याचबरोबर सायबर लॉ, टॅक्सेशन, बिझनेस लॉ या विषयांचेही त्यांनी शिक्षण घेतले. असून सध्या हे विषय विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.

याबरोबरच त्या कामगार कायदा, निवडक मालमत्ता अधिकार व व्यवसाय कर या विषयीचे मार्गदर्शन ही करीत असतात. या सर्व पदव्या बरोबरच जया उभे यांनी इंग्रजी, संस्कृत, उर्दू, कन्नड या भाषा तसेच मोडी लिपीचे ज्ञान संपादन केले असल्याने त्यांना विश्वकर्मा विद्यापीठाच्यावतीने डॉक्टरेट पदवीने गौरविण्यात आले. अॅड. जया उभे यांचा विविध सामाजिक कार्यातही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.