Pimpri : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा पिंपरीत निषेध (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केला. यामध्ये डॉक्टर गंभीर जखमी झाले. या घटनेच्या निषेधात डॉक्टरांच्या संघटनेने आज (सोमवारी) 24 तासांचा बंद पाळला. तसेच पिंपरी-चिंचवड मधील डॉक्टरांच्या संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात डॉक्टरांच्या संघटनांनी निषेध व्यक्त केला. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड अध्यक्ष डॉ. सुहास माटे, पेटरन डॉ. दिलीप कामत, सचिव डॉ. सुधीर भालेराव, माजी अध्यक्ष डॉ. संजय देवधर, पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजीव दाते, इंडियन डेंटल असोसिएशनच्या डॉ. मनीषा गरुड, डॉ. दीपाली पाठक, त्याचबरोबर त्वचारोग तज्ञ, पॅथॉलॉजी विभाग, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, विविध मेडिकल कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

पश्चिम बंगालमध्ये उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन ट्रक भरून आलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पश्चिम बंगाल मधील डॉक्टरांनी शुक्रवारपासून काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज (सोमवारी) एक दिवसाचा संप जाहीर केला. या संपात इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्न सर्व संघटनांनी पाठिंबा दिला. हा संप सोमवारी (दि. 17) सकाळी सहा ते मंगळवारी (दि. 18) सकाळी सहा दरम्यान असणार आहे.

डॉक्टर म्हणजे देव नाही. डॉक्टर हा सुद्धा सर्वसामान्य माणूस आहे. तो त्याची पूर्ण कौशल्ये वापरून रुग्णावर उपचार करीत असतो. काही वेळा वैद्यकीय उपचार सुरु असताना रुग्ण दगावतो. त्यात डॉक्टरांची चूक नसते. तरीही रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ले होतात. डॉक्टरांना समजून घेण्याची गरज आहे. डॉक्टरांवर वाढत्या हल्ल्यांवर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक आहे, असे मत डॉ. सुधीर भालेराव यांनी व्यक्त केले.

https://www.youtube.com/watch?v=nzAlq2X45dU&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.