Pimpri: पालिकेच्या मिळकतींवर ‘डॉग स्कॉड’चा राहणार वॉच 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महत्वाच्या, अतिमहत्वाच्या मिळकतींच्या सुरक्षिततेसाठी ‘डॉग स्कॉड’ची व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान यापूर्वी देखील महापालिकेच्या मिळकतीवर डॉग स्कॉडची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती . त्यामध्ये प्रायोगिक तत्वावर निगडी प्राधिकरणातील जलशुद्धीकरण सेक्टर एक , दोन, दुर्गादेवी उद्यान आणि आकुर्डीतील हेगडेवार भवन कचरा वाहतुक केंद्रावर डॉग स्कॉड’चा वॉच राहणार आहे. एक डॉग आणि दोन हॅन्डलर वर प्रतिमहिना 60 हजार रुपये खर्च येणार असून हे काम सत्यश्री एंटरप्रायजेस या संस्थेला देण्यात येणार आहे. 

शहरात महापालिकेच्या अनेक मिळकती आहे. या मिळकतींच्या सुरक्षिततेसाठी कर्मचारी तैनात असतात. परंतु, अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडू लागल्या आहे. त्यामुळे महत्वाच्या, अतिमहत्वाच्या मिळकतींच्या सुरक्षिततेसाठी ‘डॉग स्कॉड’ तैनात केले जाणार आहेत. सुरक्षा विभागाकडून प्रायोगिक तत्वावर ‘डॉग स्कॉड’ कडून महापालिकेच्या महत्वाच्या मिळकतीवर व अतिमहत्वाच्या मिळकतीवर सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येणार आहे. एजन्सीकडून नियुक्त केलेल्या ‘डॉग स्कॉड'( एक डॉग आणि दोन हॅन्डलर) यावर प्रतिमहा 60 हजार खर्च करण्यात येणार आहे.

निगडी प्राधिकरणातील जलशुद्धीकरण सेक्टर एक ,  दोन, दुर्गादेवी उद्यान आणि आकुर्डीतील हेगडेवार भवन कचरा वाहतुक केंद्रावर 12 महिने ‘डॉग स्कॉड’चा सुरक्षा तैनात केली जाणार आहे. यासाठी येणा-या खर्चास आणि तरतुद ही ठेकेदारी पध्दतीने सुरक्षा व्यवस्था या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यास स्थायी समितीची मान्यता घेतली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.