Pimpri : विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी येथे घडली.

पती अक्षय हनुमान दळवी (वय 26) आणि सासू सुनीता हनुमान दळवी (दोघेही रा. गांधीनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 45 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर 2012 ते 10 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत ही घटना घडली. आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्या मुलीस सासरी नांदत असताना पती अक्षय आणि सासू सुनीता यांनी दिलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तिने गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.