Pimpri: कोरोनाची भीती नको, काळजी घ्या, पथ्ये पाळा आणि जीवनशैलीत बदल करा, आयुक्तांचा सल्ला

Pimpri: Don't be afraid of corona, be careful, follow diet and make lifestyle changes, advises Commissioner shravan hardikar लॉकडाऊनपूर्वी दिवसाला एक हजार चाचण्या केल्या जात होत्या. आता दिवसाला तीन हजार केल्या जात आहेत.

एमपीसी न्यूज – कोरोना आपल्यातून गेला नाही. त्याच्यासोबत जगायला शिकावे लागणार आहे. नाहीतर पुन्हा लॉकडाऊन नशिबी आहे. सुरक्षित अंतर, एकमेकांच्या संपर्कात न येणे, विनाकारण बाहेर न पडणे ही पथ्ये पाळली. तर, आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो. कोरोनासोबत जगताना छोट्या-छोट्या आनंदाना मूरड घालावी. योग्य ती काळजी घेऊन आनंद अबाधित ठेवता येईल. जीवनशैलीत थोडीसी मूरड घातल्यास कोरोनासोबत निश्चितपणे जगता येईल. कोरोनाची अनाठायी भीती बाळू नये, काळजी घ्यावी असे सांगत शहरवासियांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

पालिकेने उपाययोजना केल्या असून वैद्यकीय यंत्रणा पूर्णपणे सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी 15 जुलैपासून लागू केलेल्या दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये आजपासून शिथिलता आणली आहे. त्यापार्श्वभूमीवर आयुक्त हर्डीकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे शहरवासियांशी संवाद साधला.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, लॉकडाऊन कोणालाच आवडत नाही. सरकारी यंत्रणांनाही लॉकडाऊन आवडत नाही. लॉकडाऊनला यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊनंतर आजपासून शिथिल करत आहोत.

कोरोना आपल्यातून गेला नाही. त्याच्यासोबत जगायला शिकावे लागणार आहे. नाहीतर पुन्हा लॉकडाऊन नशिबी आहे. लॉकडाऊन शिथिल होत असताना पथ्ये पाळायला पाहिजेत.

लॉकडाऊन पूर्वीच्या काळात शहरात रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत होती. त्यामुळे भयभीत स्थिती निर्माण झाली होती. कोरोना झाला तर गंभीरच होणार आहोत. आयसीयूत दाखल होणार असून मरणारच आहोत, अशी अनाठायी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती असे सांगत आयुक्त म्हणाले, आजपर्यंतची आकडेवारी काहीतरी वेगळेच सांगत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दहा हजाराच्या पुढे गेला आहे.

पण, त्यामध्ये खरोखर म्हणावेत असे 8100 ते 8200 रुग्ण होते. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसलेली नव्हती. ते केवळ पॉझिटिव्ह होते. त्यामुळे ते ‘कोरोना’चे वाहक होते. त्यानी स्वत:च्या प्रतिकार शक्तीवर लक्ष दिले. तर निश्चितपणे बरे झाले आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

शहरातील डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. 15 टक्के रुग्णांमध्ये दिसत असलेली लक्षणे अत्यंत सौम्य स्वरुपाची आहेत. त्यांना ताप, खोकला, चव समजत नाही. काही थोडक्या लोकांना श्वासनाचा त्रास होत आहे.

त्या रुग्णांसाठी ऑक्सिजन, आयसीयूचे बेड उपलब्ध आहेत. पण, भितीला उपाय नाही. एकदा एखाद्याच्या मनावर भितीचा राक्षस येवून बसला. तर, त्याला काही उपाय नाही. त्यामुळे भीती बाळगू नका, असे आवाहन त्यांनी केले.

_MPC_DIR_MPU_II

आज प्रत्येकजण तणावाखाली आहे. प्रशासकीय यंत्रणेसह घरात असल्याने नागरिक तणावत आहेत. सुरक्षित अंतर पाळा, संपर्कात येवू नका, असे सांगतो. पण, अनेक जण त्याचे उल्लंघन करताना दिसून येत आहे.

ताणतणाव हलका करण्याचा एकमेव चांगला उपाय आहे. तो म्हणजे कोरोनासोबत जगायला शिकणे. कोरोनासोबत जगण्यासाठी काही पथ्ये पाळायची आहेत.

आजच्या आखाड पार्ट्या कोरोनासोबत जगताना अत्यंत घातक राहणार आहेत. अशा छोट्या-छोट्या आनंदाना मूरड घालावी. त्याच्यात थोडंसं परिवर्तन करावे. योग्य ती काळजी घेऊन आनंद अबाधित ठेवता येईल.

जीवनशैलीत थोडीसी मूरड घातल्यास कोरोनासोबत निश्चितपणे जगायला शिकता येणार आहे. आपापल्या घरात थांबूया, आजचा मोह टाळूया. चार महिन्यात अनेक सण घरात साजरे केले. स्वत:च्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी स्वत:वर बंधने घातली. तरच अनलॉक यशस्वी होईल.

चाचण्यांचा वेग वाढविला
आयुक्त म्हणाले, पालिकेने कोरोना चाचणीचा वेग प्रचंड प्रमाणात वाढविला आहे. लॉकडाऊनपूर्वी दिवसाला एक हजार चाचण्या केल्या जात होत्या. आता दिवसाला तीन हजार केल्या जात आहेत.

हायरिस्क कॉन्टॅक्ट शोधून चाचण्या करणे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आयसोलेट करण्यावर प्रशासन भर देत आहे. ज्या रुग्णांना त्रास होत आहे. त्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार देण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

रुग्णालये तयार केली आहेत. सीसीसी सेंटरमध्ये वाढ केली आहे. 2000 हजार बेडची सोय केली आहे. प्रत्येक प्रभागात स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने सीसीसी तयार करत आहोत. ऑक्सिजनची गरज असलेल्यांसाठी जम्बो तयारी करत आहोत.

पण, भीतीचा राक्षस स्वत:च्या खंबीर मनाने, जीवनशैलीत मूरड घालून मानगुटीवरुन उतरवून ठेवायचा आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवावी. गरम पाणी पित रहावे. गुळण्या करत राहावे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.