Pimpri: पक्षाला, नेत्यांना कमीपणा येईल अशी चूक करणार नाही – नवनिर्वाचित महापौर माई ढोरे

एमपीसी न्यूज – भाजपच्या प्रदेश स्तरावरील आणि शहरातील नेत्यांनी विश्वास ठेऊन माझ्यासारख्या ज्येष्ठ नगरसेविकेवर शहराची धुरा सोपविली आहे. भाजपची पहिली महिला महापौर होण्याची संधी मला मिळाली. मी जबाबदारीने कामकाज करणार आहे. पक्षाला, भाजप नेत्यांना कमीपणा येईल, अशी चूक करणार नाही, असे नवनिर्वाचित महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी सांगितले.

माई ढोरे यांची महापौरपदी बहुमताने निवड झाली. त्या शहराच्या 26 व्या तर सातव्या महिला महापौर झाल्या आहेत. निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, शहराच्या विकासामध्ये जी काही कमतरता आहे. शहराची काही स्वप्ने आहेत. हा सगळा अभ्यास करुन त्या गोष्टीला प्राधान्य देणार आहे. मावळते महापौर राहुल जाधव यांची अपुरी राहिलेली विकास कामांची स्वप्ने देखील पुर्ण करणार आहे.

शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम करणार आहे. शहरातील पाणी समस्या निवारण करून नागरिकांना भरपूर पाणी उपलब्ध होईल याचे तज्ञांमार्फत नियोजन करून भविष्यात पाणी प्रश्नावर ठोस उपाय योजना करण्यात येईल. सर्वांग सुंदर पिंपरी-चिंचवड शहराचे स्वप्न साकार करण्याचा मानस असून तो नक्की पूर्ण करणार असल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले.

या कामांना देणार प्राधान्य!
स्वच्छ सुंदर शहरासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखणार
शहरातील पाणी समस्या दूर करण्यासाठी तज्ञांमार्फत नियोजन
भविष्यात पाणी प्रश्नावर ठोस उपाय योजना
उद्याने,क्रिडांगणे,जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे यांना चांगल्या सुविधा
इंद्रायणी,पवना,मुळा नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी पाठपुरावा
नदी लगतच्या क्षेत्रात पुरसंरक्षक भिंती उभारणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.