Pimpri: वायसीएममध्ये गर्दी करु नका, महापालिकेच्या इतर दवाखान्यात वैद्यकीय प्रमाणपत्र मिळेल

एमपीसी न्यूज – लॉकडाउनमुळे अडकलेल्यांना मूळ गावी जाण्यासाठीच्या परवानगीसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र पिंपरी महापालिकेचे इतर रुग्णालये, दवाखान्यात तपासणी करुन देण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे कोविड- 19 साठी निर्धारीत केलेले रुग्णालय आहे. त्यामुळे नागरीकांनी वायसीएममध्ये तपासणीसाठी गर्दी कर नये, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

कोरोना कोविड 19 या रोगाचा संसर्ग रोखणे, प्रतीबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे इतर राज्यातील तसेच महाराष्ट्राचे बाहेर जिल्ह्यातील स्थलांतरीत मजूर, पर्यटक, विद्यर्थी अडकून पडलेले आहेत. या सर्वांना त्यांचे इच्छेनुसार मूळ गावी जाण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करण्या आली आहे.

या प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी खासगी नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायीक यांचेकडे करता येईल. त्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तसेच महापालिकेच्याही सर्व रुग्णालये, दवाखान्यातही तपासणीची सुविधा उपलब्ध केली आहे.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे परीसरातील दवाखाना तपासणी उपलब्ध आहेत.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय:- आकुर्डी रुग्णालय, संभाजीनगर येथील साई अंब्रेला डिस्पेंसरी, दत्तनगर दवाखाना चिंचवड, इ.एस.आय. हॉस्पीटल मोहननगर, भाटनगर दवाखाना भाटनगर पिंपरी-चिंचवड स्टेशन दवाखाना एमआयडीसी ऑफीस समोर चिंचवड

‘ब’ क्षेत्रीय कार्यालय:- काळेवाडी दवाखाना पोलीस चौकीसमोर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (नविन तालेरा रुग्णालय) चिंचवड, प्रेमलोक पार्क दवाखाना- दळवीनगर, बिजलीनगर दवाखाना , वाल्हेकरवाडी दवाखाना, किवळे दवाखाना-मनपा शाळेजवळ,

‘क’ क्षेत्रीय कार्यालय:- नेहरूनगर दवाखाना-मनपा गोडाउन जवळ, खराळवाडी दवाखाना बालभवन इमारत.

‘ड’ क्षेत्रीय कार्यालय:- पिंपळेगुरव दवाखाना- मनपा शाळेजवळ पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर दवाखाना, पुनावळे दवाखाना, पिंपळे निलख दवाखाना-औध कॅम्प पुणे.

‘इ’ क्षेत्रीय कार्यालय: – भोसरी रुग्णालय, मोशी दवाखाना, चहोली दवाखाना, दिघी दवाखाना, बोपखेल दवाखाना, नवीन भोसरी रुग्णालय-अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर भोसरी.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालय:- घरकुल दवाखाना, यमुनानगर रुग्णालय, तळवडे दवाखाना, प्राधिकरण दवाखाना-सिंधुनगरनिगडी., म्हेत्रेवस्ती दवाखाना.

‘ग’ क्षेत्रीय कार्यालय:- जिजामाता दखावाना-जुन्या डिलक्स टॉकीजवळ पिंपरी, पिंपरी वाघेरे दवाखाना -पिंपरी गाव,थेरगाव रुग्णालय-थेरगाव.

‘ह’ क्षेत्रीय कार्यालय:- वायसीएम रुग्णालय- संत तुकाराम नगर, सांगवी रुग्णालय-जूनी सांगवी, कासारवाडी दवाखाना, दापोडी दवाखाना, फुगेवाडी दवाखाना, जिल्हा रुग्णालय पुणे-औध रोड सांगवी पुणे.

या ठिकाणीही फ्ल्यू क्लीनीक सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणीही नगरीकांना आपली तपासणी करुन प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येईल. या शिवाय खासगी रुग्णालयात तपासणी करून प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येणार आहे. येथील प्रमाणपत्रही पर राज्यात व पर जिल्ह्यात जाण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.