Pimpri : डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या शिक्षकांचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक दिवसाचे वेतन

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व तंत्र शिक्षण संचनालय यांच्या आवाहनास प्रतिसाद देत, एकत्रितपणे एक लाख रूपयांचा निधी जमा केला.

त्यानंतर हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड – 19 साठी बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे.

महाविद्यालयाकडून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व शिक्षक यांनी स्वत: घरी तयार केलेले कापडी मास्क आणि महाविद्यालयात तयार केलेले सॅनिटायझर, यांचे पिंपरी – चिंचवड येथील विविध भागात मोफत वाटप करण्यात आले.

टाळेबंदीच्या काळामध्ये सर्वसामान्य कुटुंबांना धान्यचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे परिसरामध्ये गरजू कुटुंबांचा सर्वे करून सर्वसामान्य व कष्टकरी कुटुंबांना अन्न धान्य किटचे वितरण करण्यात आले आहे.

याच जबाबदारीच्या भावनेतून महाविद्यालयातील प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड 19 साठी जमा केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.