Pimpri : डॉ. डी. वाय. पाटीलच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म्युला व्हेइकल स्पर्धेमध्ये यश

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अँड रिसर्च आकुर्डी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाच्या जिनिसिस 16 मोटरस्पोर्टस् या विद्यार्थांच्या संघाने एसएइ (SAE)2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नांत राष्ट्रीय पातळीवर 120 संघांमधून 37 वे स्थान पटकावले.

या कार्यशाळा व स्पर्धेसाठी मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ सुनील डंभारे, प्रा. फिरोझ पठाण आणि प्रा. संदेश सोले पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. विजेत्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार सतेज पाटील, डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक (निवृत्त) कर्नल एस के जोशी, प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील व कुलसचिव वाय के पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

या स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचा अनुभव आणि कामगिरी बघुन संघाचे मार्गदर्शक मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ सुनील डंभारे यांनी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संघाला मदत केली. हि स्पर्धा सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनीरिंग इंडियाच्या( एसएइ) वतीने ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटमधे आयोजित केली होती. फॉर्म्युला व्हेईकल (Formula Vehicle) बनवण्यासाठी एकूण 7 लाख खर्च आला. मेकॅनिकल विभागातील विद्यार्थांच्या संघाने एसएइ सुप्रा (SAE SUPRA) २०२० च्या स्पर्धेसाठी पुन्हा जोमाने नवीन वाहनावर काम सुरु केले आहे. जिनिसिस 16 मोटरस्पोर्टस् या संघाची स्थापना 2016 मध्ये झाली असून संघाने 2016 ते 2018 दरम्यान 3 राष्ट्रीय पातळीवरच्या ‘ गो कार्टिंग ‘ च्या स्पर्धांमध्ये भाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.