Pimpri : डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राला ‘ग्रीन हॉस्पिटल’ पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – असोशिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्स, दिल्ली यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राला प्रथम क्रमांकाचा ग्रीन हॉस्पिटल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रीन हॉस्पिटल सर्वेक्षणात पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील मेडिकल हॉस्पिटलने बाजी मारली आहे. दि. ७ फेब्रुवारी रोजी बैंगलोर येथे पार पडलेल्या समारंभात केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

रुग्णालय व परिसरातील वृक्षाचे जतन आणि संवर्धन, पर्यावरणपूरक साधनांचा वापर, पाण्याचे योग्य नियोजन व शुद्धीकरण, पुनः वापर, सौरऊर्जा प्रकल्प, खतनिर्मिती प्रकल्प, आधुनिक यंत्रणेतून वीज बचत, प्लॅस्टिक बंदी, प्रदूषणमुक्त वाहनाचा वापर, स्वच्छता, देखभाल, संसर्ग नियंत्रण, जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण प्रक्रिया, जनजागृती, भिंतीचित्रांद्वारे संदेश फलक आदी प्रमुख घटकांचा ग्रीन हॉस्पिटल सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता. असोशिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्सच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर केल्या जाणाऱ्या या सर्वेक्षणात विविध संस्थांचा समावेश होता.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्रीन हॉस्पिटल पुरस्कार आमच्या हॉस्पिटला मिळणे ही फार अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार आज मिळाल्याने अधिकच आनंद होत आहे. ग्रीन हॉस्पिटल पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेली ही कौतुकाची थाप अधिकच उत्साह वाढविणारी आहे, अशी भावना कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी असोशिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्सचे अध्यक्ष डॉ अलेक्सझेंडर थॉमस, डायरेक्ट जनरल डॉ गिरीधर ग्यानी तसेच डॉ. डी. वाय.पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एच.एच.चव्हाण उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.