Pimpri: पालिकेच्या दोन वाहनचालकांची पदोन्नती रद्द

एमपीसी न्यूज – वाहनचालकपदी पदोन्नती केलेल्या दोन कर्मचा-यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. पदोन्नतीने निवड केलेला कर्मचारी अवजड वाहन चालविण्यास अपात्र ठरला. तर, दुस-या कर्मचा-याने वैयक्तिक व घरगुती कारणास्तव चालकपदावरील निवड रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हे आदेश दिले आहेत.

पदोन्नती निवड समितीच्या 12 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत महापालिका आस्थापनेवरील पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याविषयी शिफारस करण्यात आली होती. महापालिका सेवेत वॉर्डबॉय पदावर कार्यरत असलेले दीपक सुखलाल परदेशी यांना वाहनचालक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. मात्र, ते अवजड वाहन चालविण्यास अपात्र ठरले. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात आली.

याशिवाय आरोग्य विभागातील गणेश ज्ञानेश्‍वर कार्ले या कर्मचा-याची वाहनचालकपदी पदोन्नती देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. मात्र, वैयक्‍तिक व घरगुती कारणास्तव ही पदोन्नती रद्द करण्याची मागणी कार्ले यांनी प्रशासनाकडे केली होती. याची दखल घेत, त्यांची वाहनचालक पदावरील निवड रद्द करण्यात आली आहे. या दोन्ही कर्मचा-यांना त्यांच्या मूळ पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.