Pimpri: कोरोना हॉटस्पॉटवर आता ‘ड्रोन’ची नजर, पालिका अधिकारी घेणार पोलिसांची मदत

Pimpri: Drone view on Corona hotspot now, municipal officials to seek police help दाट लोकवस्त्या, लहान घरे यामुळे अजूनही लोकांची वर्दळ दिसून येत आहे. या भागातील नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील झपाट्याने रुग्ण वाढणा-या कोरोना हॉटस्पॉटमधील गर्दीवर आता ‘ड्रोन’द्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका पोलिसांची मदत घेणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहराच्या विविध भागात रुग्ण वाढत आहेत. परंतु, काही भागात मोठ्या संख्येने रुग्ण वाढ होत आहे.

आनंदनगर झोपडपट्टी, दापोडी, नेहरुनगर, विठ्ठलनगर, भाटनगर, बौद्धनगर, रमाबाईनगर, वैभवनगर साईबाबानगर, अजंठानगर, दिघी, बोपखेल, काळेवाडी हे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत.

दाट लोकवस्त्या, लहान घरे यामुळे अजूनही लोकांची वर्दळ दिसून येत आहे. या भागातील नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यासाठी नागरिकांच्या हालचालींवर आता ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील हॉटस्पॉट भागात मोठ्या संख्येने रुग्ण वाढ होत आहे. त्या भागात ‘कंटेनिंग’ करणे आवश्यक आहे. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे.

त्याबाबत पोलिसांशी चर्चा झाली आहे. तिथे ड्रोनचा पण वापर करण्याचा विचार केला आहे. ड्रोनद्वारे कंटन्मेंट झोनवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. तेथील नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

नियमांचे पालन केले जात नसल्याने पिंपरी कॅम्प बंद केला आहे. अन्य ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास थेट तो भाग देखील सील केला जाणार आहे.

किमान तीन दिवसांसाठी सील केले जाईल. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणे थुंकणे, मास्क न घालणा-यांविरोधात कारवाई केली जात आहे. दंडाच्या रकमेतही वाढ केली असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.