Pimpri : मासुळकर कॉलनीमध्ये औषध फवारणी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – मासुळकर कॉलनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणी भोसरी शिवसेनेचे प्रदीप चव्हाण यांनी क प्रभागाकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की,  मासुळकर कॉलनी, अजमेरा, वास्तुउद्योग, झिरो बॉईज चौक या भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिकांना डेंग्यु मलेरिया या आजाराने ग्रासले आहे. डेंग्यु, अळ्यांची तपासणी मोहिम राबवावी.आरोग्य विभागाने त्वरीत लक्ष घालावे,अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.