Pimpri : 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला 127 तळीरामांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीच्या नियमांसह ड्रंक ॲड ड्राइव्हवर देखील पोलिसांची करडी नजर आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दारू पिऊन वाहन चालविणा-यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. रविवारी (दि. 30 डिसेंबर) पोलिसांनी 127 दारू पिऊन वाहन चालविणा-या तळीरामांवर कारवाई केली आहे.

दारू पिऊन वाहन चालविणे स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेस धोका पोहोचवणारे आहे. त्यामुळे पोलिसांकडून अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे सध्या 15 ब्रीद ॲनालायझर आहेत. त्यापैकी 8 नादुरुस्त आहेत. तसेच ऑनलाइन चलन करण्यासाठी 63 यंत्रे आहेत. आणखी 145 यंत्रांची मागणी पोलिसांनी सरकारकडे केली आहे. यामाध्यमातून तळीराम झालेल्या वाहनचालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. परिमंडळ एकच्या हद्दीत 69 आणि परिमंडळ दोनच्या हद्दीत 58 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

आयुक्‍त आर.के.पद्मनाभन म्हणाले, “मद्य प्राशन करून वाहन चालविणे धोक्याचे आहे. यामुळे अनेकदा अपघात होतात. फक्‍त 31 डिसेंबरच्या रात्री मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केल्यास मोठा विरोध होतो. यामुळे गुरुवारपासूनच (दि. 27) मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.”

पोलीस स्टेशन आणि कारवायांची संख्या –
परिमंडळ एक
पिंपरी – 10
चिंचवड – 04
निगडी – 12
भोसरी – 06
एमआयडीसी भोसरी – 10
दिघी – 12
चाकण – 14
आळंदी –  01

परिमंडळ दोन
सांगवी – 05
वाकड – 23
हिंजवडी – 05
चिखली – 14
तळेगाव – 08
तळेगाव एमआयडीसी – 03

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.