Pimpri : कोरोना वाढला, मास्कची किंमतही वाढली

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीमुळे (Pimpri) यापूर्वी लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यामुळे मास्कला मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मास्कचा किमतीत वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरात दिवसाला वीस ते पंचवीस रुग्ण आढळून येत आहे. त्यामध्ये 200 हून सक्रिय रुग्ण शहरात आहेत. चिंचवड शाहूनगर येथील 89 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामध्ये दिवसाला होणाऱ्या कोरोना रुग्णांची वाढ त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिक मास्क वापरताना दिसून येत आहेत.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. नोकरदारांना घरी बसण्याची वेळ आली. हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू नये. म्हणून अनेक नागरिकांकडून नियमांचे पालन सकारात्मक दिसून येत आहे.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 32 – अनग्रेसफुल ग्रेसी

शहरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिक (Pimpri) मास्क वापरताना दिसत आहे. विद्यार्थी, प्रवासी यांच्याकडून योग्य रीतीने पालन केले जात आहे. त्यामध्ये मास्क, सॅनिटायझर वापर वाढला आहे. त्यामुळे मास्कला मागणी वाढली आहे.

दहा रुपयांच्या मास्क 40 रुपयांना? 

कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे मास्कच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे यापूर्वी 10 रुपयांना मिळणारा मास्क 70 ते 80  रुपयांना खरेदी करावा लागत आहे. तसेच, मास्कची साईज, क्वालिटी यावरून किंमत ठरलेली असते. असे व्यापाऱ्याकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.