_MPC_DIR_MPU_III

Pimpri: शहरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणि रावेत पंपींग स्टेशन येथे दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात गुरूवारी (दि.7) सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि.8 ) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

महापालिकेने 1 मार्चपासून आठवड्यातून विभागनिहाय एकदा पाणीकपात सुरू केली आहे. ज्या भागांत बुुधवारी (दि.6) व शुक्रवारी (दि.8) पाणी बंद असते. त्यादिवशी त्या भागात नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी केले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.