BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ‘ई’ बसेस व ई-चार्जिंग स्टेशन निर्माण करणाऱ्या चीनच्या शिष्टमंडळाची महापालिकेला भेट

0

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलसाठी ई बसेस व ई-चार्जिंग स्टेशन निर्माण करणाऱ्या चीन मधील कंपन्यांच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट दिली. या प्रकल्पाची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना दिली.

यावेळी पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे, नगरसेवक सुरेश भोईर उपस्थित होते. या कंपन्या ई बसेस, ई चार्जिंग स्टेशन तयार करीत असून कंपन्याच्या संचालकांनी ई बसेस, ई वाहने, पीएमपीएमएल इलेक्ट्रीक वाहनांकरिता ई चार्जिंग स्टेशन तयार करणाऱ्या या प्रकल्पासाठी चार्जिंग स्टेशनचे कामकाज करणार असल्याचे यावेळी सांगितले.

त्याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक ते लवकरच सादर करणार आहेत. या शिष्टमंडळामध्ये झाओ झिनुआ, लि झिंग मिंग, रू योंग घेग, लियु युआन तसेच नागपूर येथील टॉपडोर कंपनीचे व्यवस्थापक डॉ. विशाल बाहेकर यांचा समावेश होता.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3