Pimpri: ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 743 सक्रिय रुग्ण, आपल्या भागात किती अ‍ॅक्टीव्ह रुग्ण?

'E' zone maximum 743 active patients, how many active patients in your area?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे.  मागील काही दिवसांपासून रुग्ण वाढीचे उच्चांक होत आहेत.   महापालिकेच्या  ‘इ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 743 सक्रिय रुग्ण आहेत. हा प्रभाग  कोरोना हॉटस्पॉट आहे. तर, सर्वात कमी म्हणजेच 255 रुग्ण ‘ड’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत. महापालिकेने शनिवारी (दि.18) रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे. आज आतापर्यंत 119 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, शहरातील आजपर्यंत रुग्ण संख्या 10 हजार 784 झाली आहे.

शहरात 10 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून शहरातील 10784 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.  त्यापैकी 6670 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  शहरातील 3914 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 202  जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  शहरातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यात झोपडपट्टी, गावठाण भागातील सर्वाधिक रुग्ण वाढ होताना दिसून येत आहे. शहरातील रुग्णसंख्या  दहा हजार पार झाली असून जुलैअखेरपर्यंत 24  हजार रुग्ण होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती सक्रिय रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. शनिवारी रात्री प्रसिध्द केलेल्या नकाशानुसार भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी परिसर येत असलेल्या  ‘इ’ प्रभागाच्या हद्दीत सर्वाधिक 743 तर त्याखालोखाल ‘अ’ कार्यालयाच्या हद्दीत 578 सक्रिय रुग्ण आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या!

‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर,  मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात 578  सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये आनंदनगर झोपडपट्टीतील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत,  किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात 551 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 342 रुग्ण आहेत.

‘ड’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे सर्वात कमी म्हणजेच 255 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे सर्वाधिक 743 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली,  कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर,  यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 539 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 574 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे 302 सक्रिय रुग्ण आहेत.  त्यामध्ये दापोडी परिसरात सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे. तर, आज रविवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत 119 जणांना लागण झाली आहे. शहरात एकूण 3914 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.