Pimpri : दिव्यांग भवनात शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील दिव्यांग भवन येथे शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र (Pimpri ) स्थापन करून दिव्यांगत्त्व नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे दिव्यांग भवन उभारण्यात आले. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाचे (Pimpri ) मध्यवर्ती केंद्र म्हणून चार मजली इमारत उभी करण्यात आली आहे.

या ठिकाणी दिव्यांगत्वाचे शीघ्र निदान व शीघ्र उपचार, शस्त्रक्रिया, विविध प्रकारच्या अत्याधुनिक थेरपी, जसे ओएई, बेरा, ऑडिओमेट्री, फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, कृत्रिम अवयव व साहाय्यभूत साधनांची उपलब्धता, सल्ला व मार्गदर्शन केंद्र, शिक्षण विषयक मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगार बाबतचे प्रयत्न,  केंद्र शासन व राज्य शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या विविध योजनांचा लाभ व दिव्यांगांच्या बचत गटाची बांधणी, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करणे. त्यांना मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे.

महापालिकेच्या व स्थानिक दिव्यांग संघटनांच्या मदतीने तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व महात्मा गांधी सेवा संघाच्या सहकार्याने हे काम करणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

Pune : समान पाणी पुरवठा योजनेसाठी  मीटर न बसवणाऱ्यांवर महापालिका करणार कायदेशीर कारवाई

सँडविक कोरोमंट इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या सीएसआरच्या माध्यमातून दिव्यांग भवनामध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांगांच्या शीघ्र निदान व थेरपीच्या यंत्रसामुग्री व साहित्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे थेरपी केंद्र अंमलबजावणी संस्था म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका तर तज्ञ म्हणून महात्मा गांधी सेवा संघ, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र या केंद्राचे कामकाज भविष्यात पाहणार आहेत.

या तिन्हीही संस्थांचा संयुक्त करार नुकताच करण्यात आला असून यावेळी आयुक्त शेखर सिंह, किरण आचार्य, विजय कान्हेकर, सचिव, महात्मा गांधी सेवा संघ तथा प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त स्वाक्षरीने करार करण्यात आला.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपआयुक्त अजय चारठाणकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट,  रोशनी आचार्य, विघ्नेश अय्यर,  श्रुतिका मुंगी, जयेश खताळ, अभिजीत मुरुककर तर महात्मा गांधी सेवा संघाच्या वतीने समन्वयक अशोक सोळंके व समन्वयक देविदास कान्हेकर हे उपस्थित (Pimpri ) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.