Pimpri :अनाथ मुलांनी घेतला पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्याचा आनंद

एमपीसी न्यूज – मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सृजनशिलतेला चालना मिळावी तसेच त्यांच्यावर बाल्यावस्थेत सुसंस्कार रुजावेत यासाठी गगनगिरी फाऊंडेशनच्या वतीने अनाथ व वंचित मुलांसाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

कै. राहुल ब्रह्मे स्मृती प्रतिष्ठान संचलित मातृसेवा विद्यामंदिर येथील वंचित व अनाथ विद्यार्थ्यांसाठी निशुल्क कार्यक्रम राबविण्यात आला. गगनगिरी फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना सर्व साहित्य पुरविण्यात आले. या कार्यक्रमात इयत्ता सहावी, सातवी व आठवी अशा तिन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणपुरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना देण्यासाठी फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रम राबवत असते, असे फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेखा भोळे म्हणाल्या. शाळेमध्ये ज्या गणेशमूर्ती बनविण्यात येतात तशी मोठी मूर्तीही फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी बनविली. त्याच मूर्तीची स्थापना शाळेमध्ये करण्यात येईल, असे मुख्याध्यापिका नैनाताई यांनी सांगितले.

गगनगिरी विश्‍व फाऊंडेशनतर्फे सर्व विद्यार्थ्यांमधून दोन विजेते काढण्यात आले. ओम भोळेच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच शिक्षकांच्या सहभागाबद्दल त्यांच्यामधून विजेती शिक्षिका घोषित करण्यात आली व त्यांनाही पोरितोषिक देण्यात आले.

यावेळी गगनगिरी विश्‍व फाऊंडेशनच्या पदाधिकारी विभावरी इंगळे यांनीत्यांच्या दिवंगत मुलीच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना उत्तजनार्थ पारितोषिक वाटप केले. गगनगिरी विश्‍व फाऊंडेशनचे पदाधिकारी व प्रशिक्षक गौरी सरोदे, शीतल नारखेडे, योगिता नारखेडे, प्रणाली चौधरी, भानूप्रिया पाटील यांनी गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. बालसेवा विद्यामंदिरातील शिक्षिका नयना मावळे, जयश्री पाटील, दिया खाडे, शिल्पा कांबळे, ज्योती चौधरी, दीपाली साबळे, प्रियंका बोबाटे, प्राप्ती कोल्हे, रुपाली पैठणकर, अलका गुंजाळ, माधुरी मगदूम या शिक्षिकांनीही मूर्ती बनविण्याचा आनंद घेतला. कार्यक्रमाला अशोक भंगाळे यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.