Pimpri: खेळाडूस शिवशाही व्यापारी संघाकडून आर्थिक मदत

एमपीसी न्यूज – निलेश गुज्जर सिंग यादव या किकबॉक्सिंग खेळाडूला तामिळनाडू येथे होणाऱ्या बॉक्सिंग स्पर्धेला जाण्यासाठी शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

परराज्यातून आपल्या महाराष्ट्र राज्यात उदरनिर्वाह करण्यासाठी आलेले हे यादव कुटुंब आहे. आपल्या पाल्याची स्पर्धेसाठी निवड झाली परंतु जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. शिवशाही व्यापारी संघाकडून त्यास पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

  • यावेळी शिवशाहीर व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष रामभाऊ कवितके, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश सचिव गणेश आहेर, मारुती मस्के बाळासाहेब गायकवाड, दीपक पाटोळे, मनोज शिंदे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.