Pimpri : कोरोनाची दहशत; बाजारात चिकन, अंडी, मटण यांची मागणी घटली

एमपीसी न्यूज- चीनच्या वुहान शहरात प्रथम आढळून आलेला करोना विषाणू अल्पावधीतच सर्व जगभर पसरला असून करोना बाधित रूग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. चीन पाठोपाठ इराण,द. कोरिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशा बरोबरच भारतात सुद्धा करोना बाधित रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी या विषाणूला घाबरून जाण्याचे कारण नाही असे सांगितले असताना देखील करोनाची चांगलीच धास्ती लोकांनी घेतल्याचे दिसून येते. चिकन, मांस, मटण यातून हा विषाणू लवकर पसरतो,  अशी चुकीची समजूत पसरवल्यामुळे चिकन विक्रेत्यांना कमालीचा तोटा सहन करावा लागत आहे.

चिकन, मांस, मटण यावर ताव मारून धुळवड साजरी करणारे यावेळी करोनाच्या भीतीने मांसाहार न करणेच पसंत करत आहेत.  ऐन सुगीच्या दिवसांत लोकांनी पाठ फिरवल्याने चिकन विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागत आहे. सरासरी पन्नास टक्के चिकन खरेदी घटली असून गावरान व ब्रॉयलर या दोन्हीच्या चिकन खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसून येते आहे. हॅाटेल व्यवसायिक व चिकन विक्रेते मोजकीच मागणी करत असल्याने पोल्ट्री व्यावसायिक सुद्धा अडचणीत सापडले आहेत. दरम्यान कोरोना बद्दल गैरसमज पसरवल्यामुळे ‌लोक भीतीपोटी चिकन खरेदी करत नसल्याची खंत चिकन विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

 

अगोदर लोक बिनधास्त चिकन खरेदी करत होते. आता कोरोनाच्या भीतीने मागणी कमी झाली आहे. एका पक्ष्याला सांभाळायला दिवसाला तीस ते चाळीस रुपयांचा खर्च येतो पण त्याप्रमाणे विक्री होत नसल्याने तोटा होत आहे. आपल्याकडे चिकन किंवा मटण चांगल्या पद्धतीने प्रक्रिया करून शिजवले जाते त्यामुळे ह्या तापमानाला कोणताही विषाणू तग धरू शकत नाही. लोकांनी चुकीची समजूत करून घेतल्याने त्यांनी चिकन खरीदीकडे पाठ फिरवली असल्याचे मत चिंचवड येथील चिकन विक्रेते सुरेश चिंचवडे यांनी व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_II
पुणे शहरात आज (मंगळवारी) दोन कोरोनाचे रुग्ण पॉझिटीव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्य सरकार व महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता योग्य खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.
संबंधित बातम्या

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.