Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात ईद ए मिलाद उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा सण ईद ए मिलाद उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढून तसेच पैगंबर मोहोम्मद यांनी दिलेल्या पवित्र संदेशाचे वाचन करत ईद साजरी झाली. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात एकूण 66 मिरवणुका काढण्यात आल्या.

_MPC_DIR_MPU_II

निगडी परिसरात रविवारी (दि. 10) सकाळी पाच मिरवणुका काढण्यात आल्या. देहूरोड येथे तीन तर दिघी येथे दोन मिरवणुका काढल्या. तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून 56 मिरवणुका काढण्यात आल्या. सायंकाळी सातच्या सुमारास या मिरवणुकांना सुरुवात झाली. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व मिरवणुका संपल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ मुस्लिम बांधवांनी कार्यक्रम घेतला.

पिंपरी-चिंचवड शहरात ‘ईद ए मिलाद’ निमित्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. एक अपर पोलीस आयुक्त, तीन पोलीस उपायुक्त, तीन सहाय्यक पोलीस आयुक्त, 24 पोलीस निरीक्षक, 222 सहाय्यक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, 1 हजार 61 पोलीस कर्मचारी, चार स्ट्राइकिंग फोर्स, राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी आणि 192 होमगार्ड असा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी स्वतः पिंपरी चौकात थांबून सर्व मिरवणुकांवर लक्ष ठेवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.